साकळी ता. यावल (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकताच ‘संविधान दिवस ‘ साजरा करण्यात आला.
या निमित्ताने उपस्थितांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी यावल कृऊबाचे माजी संचालक विलास नाना पाटील, ग्रा.पं.सदस्य खतीब सायबू तडवी, शरद श्रावण बिऱ्हाडे,सै.अश्पाक सै.शौकत, ग्रामविकास अधिकारी मकरंद सैदाणे, वरीष्ठ लिपिक पंढरीनाथ माळी, कनिष्ठ लिपीक बाळकृष्ण तेली, कर्मचारी लिलाधर मोरे, ग्राम रोजगारसेवक कृष्णा पाटील,संगणक परिचालक विजय बाविस्कर व आदी उपस्थित होते.