साकळी ता. यावल (प्रतिनिधी) साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला.
संविधान दिवस निमित्ताने भारत माता व डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पूजन करून सामूहिक संविधान वाचन करण्यात आले. तसेच मुंबई येथील आतंकवादी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील, डॉ. स्वाती कवडीवाले,डॉ अमोल आहिरे आरोग्य सहायिका सुलभा पाचपांडे औषध निर्माता विजय चोपडे आरोग्य सेवक सलाउद्दीन शेख आरोग्य सेविका मनीषा कोळी, मालती चौधरी, सविता चौधरी, सविता कोळी, संध्या ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जंजाळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.