धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री खु॥ येथील आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळेत आज ऑनलाइन पध्दतीने संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेच्या विद्यार्थीनी कु माहेश्वरी बडगुजर , तेजस्वीनी पाटील यांनी भारतीय संविधान उद्देशिका वाचन केले. शाळेचे उपशिक्षक ,सतिश शिंदे ,शरीफ पटेल यांनी संविधान आपल्याला कश्या प्रकारे कवच रक्षण करते व आपल्या मूलभूत हक्का प्रति आपण जागृत असावे यावर विश्लेषण दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली चौधरी यांनी अध्यक्षस्थाना वरून संविधान ची सम्पूर्ण माहिती व बालहक्क ,महिला हक्क , शैक्षणिक हक्क , राष्ट्रीय सण , देशा प्रति निष्ठा , या मुद्यावर प्रकाशझोत टाकला. संविधान सन्मान ऑनलाईन कार्यक्रम वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ऑनलाईन संविधान कार्यक्रमाचे आयोजन सोरभ देसले यांनी केले.