TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक : विरोधकांना जी चौकशी करायची असेल ती करावी ; एकनाथराव खडसेंचा इशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीकरिता महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मुक्ताई मंदिर येथे आदिशक्ती मुक्ताईचे विधिवत पुजन करून आणि नारळ वाढून करण्यात आला. रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या नियमानुसार तारण ठेवून सर्व कर्ज दिले असून कर्जफेड नियमित आहे. हे सर्व नियमानुसार झालेले आहे. विरोधकांना जी चौकशी करायची असेल ती करा, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी दिला आहे.

एकनाथराव खडसे म्हणाले, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकाराचा समृद्ध वारसा असलेली आशिया खंडातील अग्रणी बँक आहे. स्व प्रल्हादभाऊ पाटील, जे एस अप्पा,ओंकार अप्पा वाघ यांच्या सारखे अध्यक्ष राहिलेली हि बँक आहे. त्यांनी जिवापाड मेहनत करून बँकेला वैभव, नावलौकिक प्राप्त करून दिला. मध्यंतरी काही चुकीच्या निर्णयामुळे बँकेची आर्थिक स्थिती खालावली होती ती सुस्थितीत आणण्यासाठी मागच्या पंचवार्षिकला सर्वपक्षीय पॅनलची निर्मिती केली. त्यांनंतर रोहिणी खडसे या चेअरमन झाल्या सर्व संचालक मंडळाने पारदर्शक पद्धतीने काटकसरीने कारभार केला. त्यातुन बँकेला असलेला संचित तोटा ६०० कोटी पर्यंत भरून काढण्यात संचालक मंडळाला यश आले. आज विरोधक खाजगी संस्थाना बेकायदेशीर कर्ज दिल्याचा आरोप करत आहेत परंतु रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या नियमानुसार तारण ठेवून सर्व कर्ज दिलेले आहेत. त्याची कर्जफेड नियमित आहे त्यातून बँकेला मोठया प्रमाणावर व्याज मिळत आहे. हे सर्व नियमानुसार झालेले आहे विरोधकांना जी चौकशी करायची असेल ती करा. यापुढे सुद्धा येणारे संचालक मंडळ पारदर्शक पद्धतीने कारभार करेल याची मी ग्वाही देतो. गेल्या संचालक मंडळाने ऑनलाईन पद्धतीने पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबवली. बँकेचे संगणकीकरण करून कारभार जलद गतीने केला. सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने नियमानुसार केले. त्यामुळे बँक एनपीए मधून बाहेर आली. बँकेचा मोठया प्रमाणात संचित तोटा भरून निघाला. बँक क वर्गातून अ वर्गात आली. हे सर्व शेतकरी बांधवांच्या सभासदांच्या मतदारांच्या सहकार्याने, विश्वासाने आणि आशीर्वादाने शक्य झाले. बँकेची ही घोडदौड अशीच कायम राखण्यासाठी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे त्यांनी आवाहन केले.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

सर्व मतदारांनी सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे – रोहिणी खडसे

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, गेल्या सहा वर्षांपासून सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने जिल्हा बँकेची अध्यक्ष म्हणून काम केले. या कार्यकाळात आदरातिथ्य व इतर अतिरिक्त खर्चाला कात्री लावून सर्व कारभार पारदर्शक पद्धतीने केला. बँकेचे शंभर टक्के संगणिककरण डिजिटलायझेशन केले. त्यामुळे बँकेचा कारभार जलद गतीने झाला. बँकेच्या ठेवी मध्ये वाढ झाली. बँकेला क दर्जातून अ दर्जात आणता आले, बँकेने शंभर वर्षाच्या इतिहासात प्रथमच स्व भांडवलातून पतपुरवठा केला, कर्जमाफीयोजनेमध्ये राज्यात उत्कृष्ट कार्या केल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर कौतुक केले आहे. नुकताच बँकेचा बेस्ट डिजिटल बँक म्हणून गौरव करण्यात आला आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने हे कार्य असेच सुरू राहील त्यासाठी आपण सर्व मतदारांनी सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे असे त्यांनी आवाहन केले.

पारदर्शक कारभारामुळेच बँकेच्या ठेवीत मोठी वाढ झाली – गुलाबराव देवकर

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गेल्या पाच वर्षात बँकेच्या संचालक मंडळाने काटकसरीनेच धोरण अवलंबुन उत्कृष्ट पारदर्शक पणे कार्य केले आहे. कुठलाही गैरव्यवहार झाला नसून विरोधक अपप्रचार करून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जिल्ह्यातील शेतकरी मतदार राजा सुज्ञ आहे. गेल्या पाच वर्षात झालेलं काम आपल्या सर्वांच्या समोर आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. संचालक मंडळाच्या विश्वासावर आणि पारदर्शक कारभारामुळे बँकेच्या ठेवीत मोठी वाढ झाली. आपल्या सर्वांचे आशीर्वाद असेच कायम ठेवून परत एकदा सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

त्रिपुरा सरकारचा निषेध करीत भुसावळात मुस्लिम बांधवांनी आर्थिक व्यापार पाळला बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : देशात २४ तासांत ८०० रुग्णांचा मृत्यू ; १ लाखापेक्षा जास्त आढळले कोरोनाबाधित !

April 10, 2021

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ विमा योजनेचा लाभ मिळावा !

June 8, 2021

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026

हे सर्व लोकशाहीला मारक आहे. त्याला जबाबदार कोण? ; राऊतांचा धडाकेबाज अग्रलेख

December 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group