नागपूर (वृत्तसंस्था) शहरातील पेट्रोल पंपावर महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. नागपूर शहरातील मेडिकल चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला होता. पेट्रोल भरत असताना कपड्यावर पेट्रोलचे थेंब उडल्याने वाद झाला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.
नागपूरच्या मेडिकल चौकात पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी भर रस्त्यात एका महिलेला जबरदस्त मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये इंडियन ऑईल पेट्रोल कंपनीच्या तीन महिला लाल रंगांचा ड्रेस घातलेल्या एका महिलेला भर रस्त्यात मारत असल्याचं दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मार खाणारी महिला पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेली होती. तिने गाडीत पेट्रोल भरलं, मात्र तिच्या कपड्यावर पेट्रोलचे काही थेंब उडाल्याने तिने पुरुष कर्मचाऱ्याच्या सोबत वाद घालत मारहाण सुरु केली. त्यामुळे इतर महिला कर्मचारी धावून आल्या. कर्मचाऱ्यांनी आधी महिलेला पकडून जाब विचारला, मात्र हा वाद इतका पुढे गेला आणि त्या महिलेलाच मारहाण सुरु झाली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे.