TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मस्तच ! अटल पेन्शन योजनेतून पती-पत्नी मिळवू शकता १० हजार ; जाणून घ्या कसे?

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सध्या भविष्याच्या चिंतेने प्रत्येकजण चिंतेत आहे. यासाठी अनेकजण गुंतवणुकीच्या काही पद्धती अवलंबतात. सेवानिवृत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (atal pension yojana) गुंतवणूक करू शकता. योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे पती-पत्नी दोघांनाही दर महिन्याला पैसे मिळू शकतात.

काय आहे अटल पेन्शन योजना?

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

अटल पेन्शन योजना (APY) ही सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. त्याचा लाभ भारतातील सर्व नागरिकांना वयाच्या ६० वर्षांनंतर दिला जातो. ही नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) च्या फ्रेमवर्कवर आधारित आहे. एपीवाय अंतर्गत ग्राहकांना प्रत्येक महिन्याला एक हजार, दोन हजार, तीन हजार, चार हजार आणि पाच हजार रुपये घेण्याचा पर्याय आहे. जर तुम्हाला यासाठी नोंदणी करायची असेल, तर तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी पात्रता काय आहे?

अटल पेन्शन योजनेंतर्गत, १८ ते ४० वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शन योजनेचा लाभ मिळवू शकतो. खाते उघडण्यासाठी किंवा या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेशी संपर्क साधावा लागेल. या योजनेचा लाभ वयाच्या ६० व्या वर्षी दिला जातो. या अंतर्गत पती-पत्नी दोघेही स्वतंत्र खाते उघडून लाभ मिळवू शकतात.

या योजनेचा काय आहे फायदा?

या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये जितक्या लवकर गुंतवणूक कराल, तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल. जर एखादी व्यक्ती वयाच्या १८ व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत सामील झाली, तर वयाच्या ६० व्या वर्षी त्याला दरमहा ५००० रुपये मासिक पेन्शनसाठी दरमहा फक्त २१० रुपये जमा करावे लागतील. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आयकर कायदा ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतचे कर लाभ दिले जातात.

३९ वर्षांखालील पती/पत्नी या योजनेत स्वतंत्रपणे गुंतवणूक करू शकतात आणि त्याचा लाभ त्यांना ६० वर्षांनंतर दरमहा १० हजार रुपये संयुक्त पेन्शन स्वरुपात दिला जाईल. पती-पत्नी ज्यांचे वय ३० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांनी त्यांच्या संबंधित एपीवाय खात्यात दरमहा ५७७ रुपये, वयाच्या ३५ व्या वर्षी ९०२ रुपये गुंतवणूक केल्यास त्यांना १० हजारांच्या गॅरंटीड मासिक पेन्शन व्यतिरिक्त कोणत्याही एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर ८.५ लाख रुपये मिळतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

खा.उन्मेष पाटील हे चिल्लर, त्यांना तर केव्हाच खपवू ; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवीन बुलेट खरेदी करून आईसोबत मोठ्या आनंदाने घरी निघाला, बुलेट तिस-यांदा बंद पडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

May 22, 2023

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी पारदर्शक आणि कार्यक्षम यंत्रणा सज्ज !

May 20, 2024

भरधाव ट्रकने दोन महिलांसह तरुणाला चिरडले !

February 2, 2024

Tips On How To Play Leovegas Casino Complete Information Gamblingbaba

August 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group