जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ४६९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे ७९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – १२६, जळगाव ग्रामीण-२२, भुसावळ-११८, अमळनेर-३७, चोपडा-५५, पाचोरा-१३, भडगाव-००, धरणगाव-०५, यावल-०६, एरंडोल-४०, जामनेर-०८, रावेर-०१, पारोळा-००, चाळीसगाव-३३, मुक्ताईनगर-०४, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण ४६९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४६ हजार २५४ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार ८०६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५८० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २८६८ रुग्ण सध्या उपचार घेताय.