धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आज आरोग्य विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ३२ शिक्षकांना बुस्टर डोस देण्यात आले तर १२ वर्षावरील ११० विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापिका डॉ. सौ.आशा शिरसाठ, पर्यवेक्षक श्री.कैलास वाघ यांनी या मोहिमेचे स्वागत केले.लसिकरण मोहिमेचे प्रमुख डॉ.मयुर जैन यांच्या मार्गदर्शनाखाली एनजीओ प्रियंका पाटील,डाटा एंट्री ऑपरेटर श्री.यश ब्रम्हे आणि सिस्टर श्रीमती आर.एच.सोनवणे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक यू.एस.बोरसे,पी.जी.पाटील, एन.आर.सपकाळे, कर्मचारी योगेश नाईक, मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे आणि शिक्षक बंधू भगिनींनी सहकार्य केले.