मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली (Maharashtra Corona Guidelines) जाहीर केली आहे. रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे निर्बंध आणि नियम १० जानेवारी २०२२ च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
काय आहेत नियम?
रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे.
राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.
अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध
सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक
प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, ५० टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही
लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी
अंत्यसंस्कारासाठी २० जणांना परवानगी
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी ५० जणांना परवानगी
१५ फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद
स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद
हेअर कटिंगची दुकानं ५० टक्के क्षमतेने सुरू, रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत बंद राहणार
पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे
शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू
रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री १० ते सकाळी ५ हॉटेल बंद राहणार आहे. होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे
नाट्यगृह, सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी.
नाट्यगृह, सिनेमागृहात संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी मात्र रात्री १० ते सकाळी ८ सिनेमागृहा बंद
काय सुरू राहणार?
लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी
अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी २० जणांना परवानगी
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी ५० जणांना परवानगी
शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू
नाट्यगृह, सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.
रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार.
काय बंद राहणार?
१५ फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद
स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद
सर्व पर्यटन स्थळं बंद
प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे
हॉटेल रात्री १० ते सकाळी ५ हॉटेल बंद राहणार आहे.
सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध
आंतरराष्ट्रीय प्रवास (भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार)
देशांतर्गत प्रवास कोविडरोधी दोन लशी किंवा राज्यात प्रवेश करण्याआधी ७२ तासांपूर्वीपर्यंत आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल ग्राह्य धरण्यात येईल. हे हवाई, रेल्वे आणि रस्ते या तिन्ही मार्गांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू राहील. प्रवास करणारे वाहनचालक, वहाक आणि अन्य सहयोगी कर्मचाऱ्यांनाही हे लागू राहील.
युपीएससी, एमपीएससी, वैधानिक प्राधिकरणे, सार्वजनिक संस्था इ. द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा
१.राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षा भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडल्या जातील. अशा परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र यासाठीच्या प्रवासाची अत्यावश्यकता सिद्ध करण्यास पुरेसे असेल.
२. राज्याच्या पातळीवर घेण्यात येणाऱ्या परीक्षा, ज्यांच्यासाठीची प्रवेशपत्रे आधीच निर्गमित झालेली आहेत किंवा ज्यांच्या तारखा आधीच निश्चित करण्यात आल्या आहेत त्या अधिसूचनेनुसार पार पडतील. अन्य सर्व परीक्षा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच पार पाडल्या जातील.
३. परीक्षांचे संचालन करताना कोव्हिडरोधी नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्यासाठी निरीक्षक नेमतील.