कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथून जवळच असलेले आडगाव येथे कोरोना लसीकरणाच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्यधिकारी डॉ. फिरोज शेख, कासोदा आरोग्य केंद्राच्या आरोग्यधिकारी डॉ. निशाद शेख, डॉ. पृथ्वीराज वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी ध ख पाटील शाळेत लसीकरणाचा पहिला डोस ४५ वयाच्या वरील नागरिकांना देण्यात आला. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची गैरसोय होऊ नये म्हणून डॉ. फिरोज शेख यांनी नियोजन केले. या अगोदर ही बऱ्याच नागरिकांनी कासोदा आरोग्य केंद्रात लसीकरण केले आहे. यावेळी गावाचे सरपंच सुनिल पवार, शाळेचे कार्याध्यक्ष भगतसिंग पाटील, ग्रा.प. सदस्य प्रविण पाटील, प्रल्हाद पाटील, सदस्य अनिल पाटील, पोलीस पाटील नितीन भूसारी, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद चिलाणेकर, मा ग्रा .प. सदस्य धिरज पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन उपसरपंच दत्तू पाटील यांनी केले. लसीकरणासाठी कासोदा आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका शोभा पाटील यांनी लसीकरण केले. त्यांना आरोग्य सेवक दिनेश जगदाळे, निलेश माळी, गणेश कंडारे, सचिन हयेळींग, आशा सेविका कल्पना तागड, सुनिता पाटील, वैशाली पाटील, रंजना माळी, पल्लवी महाजन, विजया पाटील, बीट हवलदार भागवत पाटील, शैलेश चौधरी, आनंद विसपू तेग्रामपंचायत कर्मचारी व शाळचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. पहिला डोससाठी १७० लोकांचे लसीकरण करण्यात आले. वेळोवेळी लसीकरणाचे डोस देण्यात येतील, अशी ग्वाही डॉ. फिरोज शेख यांनी दिली.