नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचे ९३.२४ लाख लोक घरी झाले असून, त्याचे प्रमाण ९४.८८ टक्के झाले आहे. तसेच सक्रिय रुग्णांचा आकडा साडेतीन लाख आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. कोरोना विषाणूची लस राज्यातील लोकांना विनाशुल्क दिली जाणार आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, केरळमधील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, अशी घोषणा विजयन यांनी केली. आतापर्यंत भाजपाशासित मध्य प्रदेश आणि बिहार राज्यात कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यामुळे, मोफत लस देणारे केरळ हे तिसरे राज्य असणार आहे. भाजपा शासनव्यतिरिक्त राज्यात कोरणा लसीची घोषणा करणारे केरळ हे पहिलेच राज्य ठरले आहे. अनेक लसी उत्पादकांनी लसीच्या तातडीच्या वापरासाठी डीसीजीआयकडे परवानगी मागितली आहे. मात्र, अद्यापपर्यंत सरकारने कोणत्याही लसीला ग्रीन सिग्नल दिला नाही. अमेरिकेच्या फार्म सेक्टर कंपनीतील दिग्गज फायझरसह सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने कोविड -१९ लस ‘कोविशिल्ड’ या देशात विकसित लसीच्या आपातकालीन वापरासाठी डीसीजीआयकडे मान्यता मागितली आहे. शनिवारी केरळमध्ये कोरोना संक्रमित ५,९४९ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात संक्रमणाची एकूण संख्या ६.६४ लाखांवर गेली आहे तर मृत्यूची संख्या २,५९४ वर पोहचली आहे.
केरळमध्ये आज ५,२६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, ज्यामुळे राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या ६,०१,८६१ पर्यंत वाढली आहे, तर सध्या ६०,०२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात एकूण कोरोना केसेस वाढून ६,६४,६३२ वर गेली आहेत. या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री विजयन यांनी केले आहे. ते म्हणाले की, खबरदारी घेतली नाही तर राज्याची अवस्था आणखी बिकट होईल.
















