जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ४५१ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधीतांची संख्या तब्बल ३९ हजार २८७ वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासात तब्बल १९ रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ९९० झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २८ हजार ४६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर सोमवारी एकाच दिवसात तब्बल ७१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर ५७
जळगाव ग्रामीण १९
भुसावळ ४८
अमळनेर ६६
चोपडा६७
पाचोरा ०७
भडगाव ०५
धरणगाव १९
यावल २२
एरंडोल २०
जामनेर १०
रावेर ०६
पारोळा ००
चाळीसगाव ८२
मुक्ताईनगर १०
बोदवड ०६
अन्य जिल्हा ०७