मुंबई (वृत्तसंस्था) अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या ‘रामटेक’ (Ramtek) या शासकीय निवासस्थान्यातील २२ कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळले आहेत. विशेष म्हणजे ही साखळी किंवा संसर्ग थांबवणं हे प्रशासनापुढील मोठे आव्हान आहे.
छगन भुजबळ यांच्या ‘रामटेक’ (Ramtek) या शासकीय निवासस्थान्यातील २२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ‘रामटेक’ बंगल्यावर गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाची तपासणी सुरु आहे. अजूनही काही कर्मचाऱ्यांच्या टेस्ट सुरु आहेत. तर काही जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. पण भुजबळ यांच्या शासकीय बंगल्यातील तब्बल अकरा कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे बंगल्यातील आणखी काही कर्मचाऱ्यांच्या चाचण्या सुरु आहेत. तर काही कर्मचाऱ्यांचे कोरोनाचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे बंगल्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
छगन भुजबळ यांच्या शासकीय बंगल्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ते सतर्क झाले आहेत. भुजबळ यांच्या हस्ते येवल्यात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार होता. त्यासाठी ते आज येवला दौऱ्यावर जाणार होते. पण छगन भुजबळ यांच्या बंगल्यात कोरोनाने शिरकाव केला. तसेच त्यांनी काल नाशिकला घेतलेल्या बैठकीत उपस्थित असलेले सिव्हिज सर्जनही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भुजबळ यांनी आपला आजचा दौरा रद्द केला आहे.