जळगाव (प्रतिनिधी) येथील नगरसेवक तथा मनपाचे स्थायी समिती सदस्य प्रशांत सुरेश नाईक यांची शासनाने निवड केली आहे.
येथील समितीचे अध्यक्ष शहराचे आमदार सुरेश दामु भोळे हे असून सहअध्यक्ष आमदार चंदू भाई पटेल आहेत. तरी सदर उर्वरित १५ अशासकीय सदस्य आहेत. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ही दक्षता समिती काम करणार असून नागरिकांच्या अडचणी सोडविणे, नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणे असे कार्य केले जाणार आहे. प्रशांत नाईक यांच्या निवडीबद्दल शिवसेना पदाधिकारी तसेच त्यांचे मित्र परिवार व सर्वपक्षीय घटकांकडून अभिनंदन करण्यात आले आहे. दरम्यान, निवडीचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पारित केले आहे.
















