साकळी (प्रतिनिधी) येथील परिसरातील कपाशी पिकावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे मोठे नुकसान झालेले असून कपाशीच्या शेतीच्या-शेती जवळ जवळ उध्वस्त झालेले आहे .
कोरडवाहू विहीरीच्या पाण्यावर लावलेल्या कपाशीच्या कैऱ्यांना मोठ्या प्रमाणात बोंडआळीचे कीड लागल्याने बोंडातून कपाशीच फुटत नसल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात चिंता वाढली आहे . बोंड अळीचा प्रादुर्भाव यामुळे परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्य भयावह असे वातावरण निर्माण झालेली असून अनेक शेतकऱ्यांनी कित्येक हेक्टर कपाशीचे शेते अक्षरशः नांगरुन टाकत आहे. एकूणच कपाशीच्या चिंताजनक स्थितीमुळे परिसरातील कपाशी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले असून त्यांना शासन स्तरावरून लवकरात लवकर मदतीचा हात मिळाला तर तो उभा राहू शकेल अन्यथा शेतकऱ्यांची मानसिक स्थिती बिघडून ते नैराश्यामुळे जीवन संपवू शकतात असे विदारक स्थिती निर्माण झालेली आहे. साकळी परिसरात सततच्या पावसाने शेतात पिकापेक्षा गवत वाढले. शेतात जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्यावर चिखल असल्याने शेतीची मशागत करता आली नाही. बोंडातून बाहेर आलेला कापूस वेचणी न झाल्याने भिजला असून, यातच कपाशीची बोंडे सडली आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.त्यातच सध्या उरल्यासुरल्या कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने बोंडातून कपाशी फुटणे ही कठीण झालेले आहे. हजारोरुपये खर्च करून हाती काही येत नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था काळजीची बनली आहे. आता या नंतर घर खर्च कसा करायचा ? कुटूंबाला कसे जगवायचे ? रब्बी हंगामाचा खर्च कोठून करायचा ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडल्या आहे. कष्ट करून उभी केलेली कोरडवाहू कपाशीचे पीक गेल्या साधारणतः महिन्याभरापूर्वी समाधानकारक होते. मात्र आता या कपांशीच्या शेतात मोठ्या प्रमाणात बोंडअळी आल्याने हे पीक पूर्णपणे धोक्यात आलेले आहे तर आता कपाशी झाडाच्या कैऱ्यांमधून कपाशीच फुटत नसल्याने शेतकर्यांमध्ये कमालीची चिंता वाढली आहे.
शासनस्तरावरून पंचनामे करण्यात यावे –
कपाशीच्या झाडाला कपाशीच येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.तरी या कपाशीच्या शेतांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी खासदार, आमदार यांचेसह सर्व लोकप्रतिनिधींनी शासन स्तरावर पाठपुरावा करावा व प्रशासनाला पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात याव्यात तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी. अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.