बोदवड (प्रतिनिधी) येथील रहिवासी व साळशिंगी येथील शेतमालक संदीप मधुकर वैष्णव यांच्या शेतातील (गट क्र.३२०) गोठ्यातून ३५ हजार रुपये किमतीचा पाच क्विंटल कापूस चोरीला गेला.
१६ जानेवारीच्या मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोठ्याच्या गेटला असलेले कुलूप व खोलीच्या दरवाजाचे कुलूप टॉमीसारख्या साहित्याने तोडले. यानंतर गोठ्यातील खोलीत प्रवेश करून पाच क्विंटल कापूस चोरून नेला. यंदा आधीच दुष्काळी वातावरण आहे. कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. त्यात आता शेती साहित्य व शेती उत्पादनांच्या चोऱ्या वाढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. साळशिंगी शिवारातील चोरीप्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.