धरणगाव (प्रतिनिधी) जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव जिल्ह्यात सध्या सहा. अधिक्षक या पदावर कार्यरत असणारे व सन १९९० मध्ये न्यायालयात रूजू होणारे असे ३२ वर्षानंतर एकत्र आलोत आणि “आठवण सन १९९० मधील, साठवण पूर्ण ३२ वर्षाची, आस्वाद मात्र २०२२ मध्ये, कशाचा साठवणीतल्या गोड आठवणींचा” या निमीत्ताने न्यायालयीन स्नेही मित्र मेळावा आज रोजी डाॅ.जहागिरदार यांचा शेतमळा, श्री क्षेत्र पद्मालय ता. एरंडोल येथे ४० न्यायालयीन सहकारी मिळून स्वागतोत्सव २०२२ या बॅनरखाली उत्साहात साजरा झाला.
सर्व सहकारी सुरूवातीला जिल्हा न्यायालयात, जळगांव येथे जमुन लक्झरी बसने निघुन श्री क्षेत्र पदमालय येथील गणपतीचे दर्शन घेऊन कार्यक्रम स्थळी पोहोचले. सुरूवातील चहा, नास्ता, पाणी झाले व पहिल्या सत्रात आपल्या कुटूंबाविषयी माहीती, ओळख परीचय व मित्रांचे अनुभव सांगितले व जुन्या आठवणीना उजाळा दिला. सन १९९० मध्ये लागलेल्या ६० सहका-यांपैकी ८ सहकारी दिवंगत तर ८ सहकारी सेवानिवृत्त झाले आहेत. कार्यक्रमाची सुरूवात दिवंगत सहका-यांना आदरांजली वाहुन तर सेवानिवृत्त सहका-यांना शुभेच्छा देऊन झाली. ओळख परीचय झाल्यानंतर आर.डी.जोशी यांनी आपल्या शरीराची रचना व आरोग्याविषयी माहिती दिली नंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. दुस-या सत्रात आर.डी.सोनवणे, गोविंद पवार, रनाळकर, डकारे यांनी रंगतदार व छान गाणी म्हणुन कार्यक्रम बहारदार केला. श्री. महाजन व श्री. सुद यांच्या म्युझिक सिस्टीमने साथ संगत दिली. दिपाली व्यास, चित्रंगा बि-हाडे व पाटील मॅडम यांनी एक मिनीट स्पर्धा घेऊन सर्वाना खेळवले व विजेत्यांना बक्षिसे दिलीत. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन महेश कोठावदे व आर.डी.जोशी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी उल्हास सोनार, योगेश सुरमारे, राजपूत यांनी मेहनत घेतली. आभार प्रदर्शन रविंद्र अडकमोल यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. बाहेर गावाहून सहकारी कार्यक्रमासाठी आलेले असल्याने त्यांना जातांना फुड पॅकेट देण्यात आले व पुढील वर्षी पुन्हा असे एकत्र येऊन स्वागतोत्सव साजरा करायचा असे ठरले.