नशिराबाद (प्रतिनिधी) गोमातेचे रक्षण व पालन करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य असून या अनुषंगाने बेळीं येथील गोशाळेचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असून सदगुरु झेंडूजी महाराज बेळीकर यांचा या गोशाळेचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावा. गायींचे पालन व रक्षण करण्याचा दृढ संकल्प करावा, भविष्यात या ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचे ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यास प्रयत्नशील आहे. बेळी येथिल गोशाळेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन या गोशाळेचे दाते व गोसेवक कार्यकर्त्यांशी संवाद त्यावेळी ते बोलत होते.
जळगाव तालुक्यातील बेळी येथिल सदगुरु झेंडूजी महाराज, बेळीकर संस्थानातील भगवान श्री कुंडलेश्वर गोशाळेत आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत आ.राजूमामा भोळे यांनी भेट देत गोशाळेची पाहणी करीत दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ राजुमामा भोळे यांचा सत्कार प.पु.भरत महाराज बेळीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
१ कोटी ६० , लक्ष निधीतून सुरू आहेत विकासकामे !
बेळी येथिल सदगुरु झेंडूजी महाराज, बेळीकर संस्थानातील भगवान श्री कुंडलेश्वर गोशाळत पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ.राजूमामा भोळे यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण १ कोटी ६० लक्ष निधीतून विविध विकास कामे सुरू यात ६० लाखाचा सभामंडप बांधकाम , ४० लाखाचे सरक्षण भिंत बांधकाम तर.४० लाख निधीतून पेव्हिंग ब्लॉक, पुलासाठी ३० लाखाचे काम सुरू असून प्रगतीत आहे.
यांची होती उपस्थिती !
यावेळी प. पु.भरत महाराज बेळीकर, जि. प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, बेळी गावाचे लोकनियुक्त सरपंच तुषार चौधरी, पं.स. सदस्य तुषार महाजन, उद्योजक पिंटूशेठ, चेतन बऱ्हाटे,
दुर्गादास भोळे, हेमंत नारखेडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.