TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासन आणि प्रशासन एकत्र आलं अन् पंतप्रधानांचा जळगावचा कार्यक्रम ऐतिहासिक झाला : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ।

माझ्या आयुष्यातला महिलांचा सर्वात मोठा कार्यक्रम : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

vijay waghmare by vijay waghmare
August 30, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगावमध्ये पंतप्रधान यांच्या उपस्थितीत ‘ लखपती दीदी संमेलन’ ही ऐतिहासिक घटना ठरली. शासन म्हणून आम्ही होतो, त्याला प्रशासनाने अत्यंत तळमळीने, झोकून देऊन काम केले म्हणून विपरीत परिस्थितीतही हा ऐतिहासिक कार्यक्रम होऊ शकला असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एवढा सुनियोजित एवढ्या मोठ्या संख्येनी महिला एकत्र आलेला कार्यक्रम आयुष्यात पहिल्यांदा अनुभवल्याचे सांगितले.

आज नियोजन भवन मध्ये ‘ लखपती दीदी संमेलन’ आणि ‘महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये सहभागी असणाऱ्या पडद्या मागच्या हातांचा गौरव ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

यावेळी मंचावर आ. सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे,अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजीव लोखंडे हे मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एक मोठा कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्यापाठोपाठ पंतप्रधानांचा एवढा भव्य कार्यक्रम तेही पावसात करणं हे सोपं काम नव्हतं. पण हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या मदतीने अत्यंत यशस्वीपणे केला यात. जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, आणि जिल्ह्यातील संबंधित सर्व यंत्रणानी अत्यंत नियोजनबद्द काम केलं त्यामुळे देशभर या कार्यक्रमाचे कौतुक होतं असल्याचे आणि तसे फोन आणि संदेश आल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

जळगाव मधला महिला सशक्तीकरण अभियाननांतर्गत घेतलेला कार्यक्रम राज्यभर गौरवला गेला आणि ‘लखपती दीदी संमेलन’ तर देशभर गाजतो आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी कुटुंबं म्हणून काम केलं. 26 एकरचा सभा मंडप, वरून पाऊस असं हे आव्हानात्मक काम गिरीशभाऊंच्या नेतृत्वात झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महिलांचा झालेला हा कार्यक्रम जळगाव जिल्ह्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा म्हणून नोंद झाली असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

आ. सुरेश भोळे यावेळी यांनीही या नियोजनाचे कौतुक करून, शेवटच्या घटकाला न्याय देण्याची पंतप्रधानांची भूमिका असल्यामुळे या कार्यक्रमाला झटणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या कार्यक्रमातील केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणांनी दोन्ही कार्यक्रमात केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित , अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अधिक्षक अभियंता प्रशांत सोनावने, नगरप्रशासन अधिकारी एकनाथ पवार यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

अधिकारी, कर्मचारी यांचा गौरवपत्र देऊन सन्मान !

‘लखपती दीदी संमेलन’ कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गौरव पत्र देऊन सन्मानीत केले. त्यात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, एस. टी महामंडळ अधिकारी, ज्यांच्या ज्यांच्यावर या कार्यक्रमाकाची जबाबदारी होती त्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यावेळी दोघांनी गौरव केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGovernment and administration came together and Prime Minister's Jalgaon program became historic: Rural Development Minister Girish Mahajan.

Related Posts

जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन ; पहूर कसबे येथील ग्रामस्थांचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने वर्धमान धाडीवाल सन्मानित

January 4, 2022

म्हसावद येथे ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री, विक्रेत्यावर जिल्हा भरारी पथकाची धडक कारवाई !

May 24, 2024

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

November 28, 2021

अजित पवारांना कोरोनाची लागण नाही : पार्थ पवार

October 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group