TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रिकेटर मिताली राजची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती

The Clear News Desk by The Clear News Desk
June 8, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भारताची महान महिला क्रिकेटपटू मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मिताली राज दीर्घकाळ भारतीय महिला क्रिकेटसाठी खेळत होती. परंतु, आता तिच्यावर क्रिकेट खेळाला अलविदा करण्याची वेळ आली (cricketer Mithali Raj retires) आहे.

भारतीय महिला क्रिकेटमधील दिग्गज आणि अनुभवी खेळाडू असलेल्या मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून मितालीने याबाबत माहिती दिली. ३९ वर्षीय मिताली एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाचे नेतृत्व करत होती. मिताली गेल्या २३ वर्षांपासून क्रिकेटशी निगडीत होती. जून १९९९ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मितालीच्या नावावर आहे. तिने २३२ सामन्यांमध्ये ५०.६८ च्या सरासरीने सात हजार ८०५ धावा केल्या आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

तिच्या नेतृत्वाखाली भारताने २०१७मध्ये महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यापूर्वी, २००५ मध्ये आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जेव्हा भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता तेव्हाही मिताली भारतीय संघाची कर्णधार होती. तिने यंदाच्या महिला विश्वचषकातही भारताचे कर्णधारपद भूषवले होते. मितालीने आतापर्यंत सहा विश्वचषकांमध्ये सहभाग घेतलेला आहे. तिच्या नावावर महिला क्रिकेटमधील अनेक विक्रम नोंदवले गेलेले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या महिला एकदिवसीय क्रमवारीमध्ये ती सातव्या स्थानवर होती.

‘इतकी वर्षे संघाचे नेतृत्व करणे ही एक सन्मानाची गोष्ट होती. त्यामुळे मला एक चांगली व्यक्ती होण्यास मदत झाली. भारतीय महिला क्रिकेटच्या विकासामध्ये मी योगदान देऊ शकले, याचा मला आनंद आहे ‘, असे मिताली आपल्या निवृत्तीच्या नोटमध्ये म्हणाली आहे. याशिवाय तिने संघातील सर्व सहकारी, बीसीसीआय, बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी आणि सर्व चाहत्यांचेही आभार मानले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून यादी जाहीर ; 'या' दोन नेत्यांना मिळणार संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंजाबमधील काँग्रेसमध्ये उभी फूट, सिद्धू यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे तेच कॅप्टन असल्याचे सिद्ध !

July 21, 2021

धरणगाव जन जागृत जनमंचची १ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बैठक

July 28, 2021

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मीनाक्षी चव्हाण

May 6, 2021

निवडणूक अर्ज दाखल करुन घरी परतणाऱ्या व्यक्तीचा दुचाकी अपघातात मृत्यू !

October 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group