जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एसटी वर्कशॉप समोरील नारखेडे मटन हॉटेलमध्ये विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री करणारे व पिणाऱ्या तब्बल अकरा जणांना ताब्यात घेत एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, पो.कॉ. मुदस्सर नौशाद काझी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एसटी वर्कशॉप समोरील नारखेडे मटन हॉटेल येथे यावेळी निलेश प्रभाकर भावसार (रा. कासमवाडी), योगेश प्रकाश पाटील (रा. गोपाळपुरा) हे बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांना मिळाली होती. त्यानुसार सपोनि अमोल मोरे, सपोनि संदीप हजारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पो.ना. मिलिंद सोनवणे, पो.हे.का. सुधीर साळवे यांच्या पथकाने नारखेडे मटन हॉटेल येथे धाड टाकली. यावेळी मिळालेली माहिती खरी होती. घटनास्थळी सुकलाल तुकाराम भिल (रा.उमाळा), राघव चव्हाण (रा.उमाळा), सुभाष मधुकर पाटील (रा.तुकाराम वाडी), शशिकांत देविदास पाटील (रा. गोपाळपुरा), निखील राजेश सोनवणे (रा. कुसुंबा), संतोष नारायण बिडकर (रा.अनुराग स्टेट बँक कॉलनी), योगेश मोहन मर्दाने (रा. गुरुनानक नगर), राजपुर धांडोरे (रा.गुरुनानक नगर), संतोष श्रावण वाघ (रा.निफाड) हे मद्य प्राशन करत होते. दरम्यान, संबंधितांच्या टेबलावर विविध प्रकारच्या देशी-विदेशी मद्याच्या एकूण ४४० रुपयाच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. तसेच सर्व ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेत मुंबई प्रोविजन ॲक्ट कलम 86 66 (ब) 85 सहा मुंबई पोलीस 131, 33 (डब्ल्यू) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे