धुळे (प्रतिनिधी) पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पतीविरुद्ध शिरपूर शहर पोलिसांनी गुन्हा केला आहे. पतीने लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच आपल्यावर बळजबरी करत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याची पत्नीची तक्रार आहे. त्यानुसार सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, विवाहितेचे माहेर शिरपूर असून सासरवाडी सावखेड ता. अमळनेर आहे. सासरी आणि माहेरी अशा दोन्ही ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २१ जानेवारी २०२१ रोजी लग्नानंतर ते ७ जुलै रोजीपर्यंत तिचा छळ झाला. लग्नानंतर मारहाण करीत शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच पीडितेची इच्छा नसताना अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करून छळ केला. तसेच प्लॉट खरेदी करण्यासाठी माहेरून ३ लाख रुपये आणावेत म्हणून सासू, सासरे, नणंद यांनी देखील त्रास दिला व सासरी नांदवण्यास नकार दिला.
याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून तिचा पती कल्पेश भीमराव महाले, मालतीबाई भीमराव महाले, भीमराव दामू महाले (रा. सावखेड, ता. अमळनेर), नणंद माधुरी समाधान पाटील, नंदोई समाधान वामन पाटील (रा. संकल्प अपार्टमेंट, विजापूर, जि. मेहसाणा, गुजरात) यांच्याविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील करीत आहेत.















