जळगाव (प्रतिनिधी) अनैतीक प्रेमसंबंध ठेवून समाजात बदनामी करण्याची भिती दाखवून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी आदील उर्फ नट्टू अल्ताफ खाटीक याला अटक केली आहे.
यासंदर्भात पिडीत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ०८ एप्रिल २०२२ रोजीच्या पुर्वी ५ ते ६ महीने वेळोवेळी आदील उर्फ नट्टू अल्ताफ खाटीक (रा. जोशीपेठ, भावसार मढी जवळ जळगाव) याने फिर्यादीच्या पत्नीशी अनैतीक प्रेमसंबंध ठेवून तिच्याशी व्हॉटसअप नंबरवर चॅटींग करायचा. तसेच मोबाईल फोनवर बोलणे करायचा. यानंतर फिर्यादीच्या पत्नीची समाजात बदनामी करण्याची भिती दाखवून वेळोवेळी आदील उर्फ नट्टु याने पिडीत विवाहितेकडे सतत पैशांची मागणी करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात आदील उर्फ नट्टू अल्ताफ खाटीक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सफौ. किरण लक्ष्मण पाठक हे करीत आहेत.
















