जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पारोळा शहरातील रहिवासी असलेले केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)चे जवान जितेंद्र देविदास चौधरी यांचे कर्तव्यावर असताना अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण पारोळा शहरात शोककळा पसरली आहे.
जितेंद्र देवीदास चौधरी हे सीआरपीएफच्या B/117 बटालियनमध्ये कार्यरत होते. ते जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरातील रहिवासी होते. त्यांच्या पार्थिवाला श्रीनगर येथून पुणे मार्गे पारोळा येथे आणले जाईल. पारोळा शहरात त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे.
त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आज, 5 मार्च रोजी, दुपारी पारोळा शहरातील कुटीर रुग्णालय समोरील स्टेडियमवर शासकीय इतमामात पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे.