धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री आणि शामखेडे येथे वेगवेगळ्या घटनेत सहा जणांविरोधात वाहनातून बैलांची निर्दयी वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत राहुल रामलाल पाटील (रा. निंभोरा ता. धरणगाव) आणि अरुण मधुकर पाटील (रा.अमोदा ता. धरणगाव) या दोघांना पोलिसांनी दि. २२ रोजी दुपारी १२ ते १२ : ३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंप्री गावाजवळ बैलांची निर्दयी वाहतूक करतांना पकडले. दोघं जण डॉक्टरांच्या प्रमाणपत्राशिवाय बैलांना निर्दयतेने दोरीने घट्ट बांधून त्यांच्या कुठल्याही चारा पाण्याची सोय न करता गाडीमध्ये पुरेशी जागा नसताना बांधून कोंबून भरुन त्यांचा छळ करुन कत्तलीच्या उददेशाने वाहतूक करीत असताना मिळून आले. या प्रकरणी पो.ना. मिलिंद सोनार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. जितेंद्र भदाणे हे करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत दि. २२ रोजी दुपारी १ ते १ : ३० वाजेच्या सुमारास शामखेडा गावाजवळ सुधाकर पुंडलिक भोई (रा अमळनेर), संजय एकनाथ धनगर (रा.चांदणीकुरे ता.अमळनेर), उमाकांत विकास धनगर (रा.ताडेपुरा, अमळनेर), दिपक मधुकर धनगर (रा.चांदणीकुरे ता.अमळनेर) हे देखील बैलांना निर्दयतेने दोरीने घट्ट बांधून त्यांच्या कुठल्याही चारा पाण्याची सोय न करता गाडीमध्ये पुरेशी जागा नसताना बांधून कोंबून भरुन त्यांचा छळ करुन कत्तलीच्या उददेशाने वाहतूक करीत असताना मिळून आले. या प्रकरणी पो.शि. वैभव बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. दीपक पाटील हे करीत आहेत.