चोपडा (प्रतिनिधी) सा-या विश्वाचे लक्ष वेधून घेणारे विश्ववंद्य दिगंबराचार्य संत शिरोमणी महातपस्वी प.पु. आचार्य विद्यासागरजी यांचा विशाल संघाचा चातुर्मास कोणत्या स्थळी होणार तसेच खान्देश भूमीत जन्मलेले कुसुंबा भूमीत निपजलेले जेष्ठ मुनिश्री (खान्देशातील दिगंबरी दीक्षा प्रथम घेणारे )आचार्य विद्यासागरजींचे परमशिष्य कुसुंबा गौरव असलेले प.पु. समाधीसागरजी महाराज तसेच विविध आचार्यश्रींचे परमशिष्य कुसुंबा भूमीतले खान्देशातील प्रथमच आचार्य पदधारी प.पु.मयंकसागर जी महाराज तसेच खान्देशातील प्रथम उपाध्याय पदधारी प.पु. दयाऋषी महाराज प.पु. सुबुद्धीसागरजी महाराज असे चार मुनी व एक माताजी प.पु.क्षुल्लिका किर्तीमतीजी असे कुसुंबा तपस्वी मुनीर्वयांच्या संख्येच्या दृष्टीने कुसुंबा हे खान्देशातून अग्रेसर गाव असल्याने दृष्टीपथास येत असे नागरिकात विशेष बोलबाला दिसून येतो. अशी माहिती खान्देश जैन समाज पत्रकार व प्रसिद्धीप्रमुख सतीश वसंतीलाल जैन यांनी दिली.
याबरोबर सोनगीर, धरणगाव, बेटाबद्, मांडळ आदी गावातूनही तपस्वी मुनी व माताची तपस्यात आहेत. प.पु. अमोघकीर्ती, प.पु. अमरकीर्ती मुनीश्री असे खान्देशातून मुनीश्री आर्यिका क्षुल्लिका माताजी तपस्वी असल्याकारणाने चातुर्मास स्थळाबाबत भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून येत आहे .चातुर्मास अवघ्या महिनावर येऊन ठेपला असला तरी काही मुनिवर्यांचे चातुर्मास स्थळ जवळजवळ निश्चित झाले असून तर काही मुनीसंघाचे नियमानुसार अवघ्या पाच-सहा दिवसा अगोदर समजते .यासाठी विश्ववंद्य आचार्य विद्यासागरजी मुनीश्री संघाचे चातुर्मास स्थळाबाबत भक्तगणांमध्ये लक्ष वेधले आहे.