पणजी (वृत्तसंस्था) गोव्याच्या किनाऱ्यावर तौक्ते चक्रीवादळ धडकले आहे. समुद्रात उंच लाटा उसळत असून परिसरात वादळासह मुसळधार पाऊस देखील सुरू आहे.
आयएमडीने दिलेल्या इशाऱ्या नंतर दादरा नगर हवेली, दमन दीव आदी समुद्र किनाऱ्यावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. येथूनच हे चक्रीवादळ मोठे तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. १८ मेच्या दुपारी पोरबंदर, गुजरातचे तट पार करण्याची शक्यता आहे. गुजरात किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चक्रीवादळामुळे लक्षद्वीप समुद्र भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन रत्नागिरी, आणि सिंधुदुर्गात वादळासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचवेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मासेमारी करण्यासाठी कोणीही समुद्रात जाऊ नये, असा इशारा जिल्हा प्रशासनाने मच्छिमारांना दिला आहे.