पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील महाराणा प्रताप चौकात असलेल्या नाश्ताच्या गाडीवर गैस सिलेंडरचा स्फोट होवून मायलेक गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले, त्याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मुळचे वेरूळी खुर्द येथील ईश्वर संतोष पाटील (वय ३२) हा तरुण सह्या संघवी कॉलनीत वास्तव्यास आहे. शहरातील महाराणा प्रताप चौकातील पेट्रोल पंपासमोर तो नाश्त्याची गाडी लावतो. नेहमीप्रमाणे तो दुकानावर आल्यानंतर नाश्त्याची तयारी करीत होता. यावेळी त्याची आई लताबाई पाटील (वय ५२) हा गॅस सिलेंडर सुरु करुन गॅस पेटवित असतांना अचानक सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. यामध्ये ईश्वर पाटील व त्याची आई गंभीररित्या भाजले गेले. परीसरातील नागरीकांनी धाव घेत जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र दोघांची तब्येत अत्तस्थ असल्याने त्यांना जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
स्फोटामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण गॅस सिलिंडर फुटल्यानंतर त्यांचा आवाज जवळपास अर्धा किलोमीटरवर पर्याय आल्याने परीसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या स्फोटामुळे दुकानाची पत्रे व संपूर्ण सेट, टेबल खुर्चा, भांडे साहित्याचे नुकसान झाले. तसेच शेजारील तीन ते चार दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.