चोपडा (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्य रस्त्यावर भाजी मंडई वाल्यांनी आपल्या भाजीची दुकाने रस्त्यावर आणली असून यामुळे वाहनधारकांना मोठी अडचण सहन करावी लागत आहे. पालिकेचा अतिक्रमण विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवार ते शनिवार यादरम्यान भाजी मंडई वाल्यांनी आपली दुकाने थाटलेले असताना वाहनचालक मोठी वाहने या रस्त्याने सरळ सरळ आणू शकत नाहीत? परिणामी नागरिकांना याचा मोठा त्रास होत असून कधीतरी इतकी बिकट परिस्थिती होते, की अक्षरशा बाया माणसांना चालण्याची तकलीफ होते? भाजी खरेदी करणारे ग्राहक, व त्यासाठी केलेला वाहनांचा वापर यामुळे या भागात वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होते? चोपडा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.