लातूर (वृत्तसंस्था) एका महिलेने आपला पतीला जिवंतपणीचं मृत केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये (Latur) घडली आहे. पती परमेश्वर केंद्रे प्रॉपर्टी (Property) मिळावी म्हणून पत्नी राजश्री केंद्रे हिने नगरपालिकेतून (Municipality) पतीचा जीवंतपणी मृत्यू प्रमाणपत्र काढल्याचा काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरातील विकास नगरमध्ये राहणारे परमेश्वर केंद्रे आणि त्यांच्या पत्नी राजश्री या दोघांमध्ये सतत भांडण होतं होती. या भांडणाला कंटाळून पती परमेश्वर हे पुण्याला निघून गेलेले. मात्र, पती पुण्याला गेल्याच्या संधीचा गैरफायदा पत्नी राजश्रीने घेतला. तिने आपल्या पतीच्या नावावरील सर्व प्रॉपर्टी हडपण्यासाठी माजी नगरसेविका रेखा आपटेचा पती ज्ञानेश्वर आपटेसह इतर साक्षीदारांच्या मदतीनं उदगीर नगरपालिकेतून राजश्रीने पती परमेश्वर केंद्रेंचे मृत्यू प्रमाणपत्र काढलं.
दरम्यान, ही बाब परमेश्वर यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी १८ जानेवारी रोजी उदगीर पोलीस ठाण्यात पत्नी राजश्रीसह इतर ६ जणांविरोधात तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणातील संबंधीतांवर गुन्हा दाखल केला. मात्र, या प्रकरणाचा तपास पोलीस धीम्या गतीनं करत असल्याचा आरोप परमेश्वर केंद्रे यांनी केला आहे. आतापर्यंत या प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेविका आणि तिच्या पतीला अखेर अटक केली आहे. मात्र अजूनही मुख्य आरोपी असलेली पत्नी राजश्री आणि ईतर आरोपी फरारच आहेत.