मुंबई (वृत्तसंस्था) ऑर्थर रोड कारागृहात बंद असलेल्या एका कैद्यासोबतच दुसऱ्या कैद्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. हा संतापजनक प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी (Mumbai Police) आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद इर्शाद शेख असे (वय 19) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थर रोड तुरुंगातील सर्कल नंबर 1 बॅरेक नंबर 7 मध्ये दोन आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्याखाली तुरूंगवासाची शिक्षा भोगत आहेत. यातील पीडित आरोपी हा 20 वर्षीय आहे. पीडित आरोपीने दिलेल्या तक्रारीनुसार, 15 मे रोजी 2 वाजेच्या दरम्यान, दुसरा 19 वर्षीय आरोपी मोहम्मद इर्शाद शेख हा त्याच्याकडे आला. त्याने पीडित आरोपीला मारहाण करत जबरदस्तीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच सदर बाबत कुणाला सांगितल्यास बघून घेण्याची धमकी दिली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर घाबरलेल्या पीडित 20 वर्षीय आरोपीने घडलेला प्रकार कारागृहातील पोलिसांना सांगितला. पीडित आरोपीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 19 वर्षीय आरोपी मोहम्मद इर्शाद शेख याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम 377, 323, 506 अन्वये अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहित साळी करीत आहेत.