जळगाव (प्रतिनिधी) येथील जोशी कॉलनीत भागवत कथेत दहीहंडी उत्सव सोमवारी साजरा करण्यात आला.
भागवत निरूपण कृष्णभक्त मनोजचंद्र महाराज, वृंदावन हे करीत आहेत. यावेळी श्रीकृष्णाने दहीहंडी फोडली. त्यानंतर गोवर्धन पर्वत उचलून इंद्राचे गर्वहरण केले. यावेळी छप्पन भोगचे आयोजन जोशी कॉलनी व आदिशक्ती महिला मंडळातर्फे करण्यात आले होते. पंचक्रोशीतील भाविक कथेचा आणि सादर करण्यात येत असलेल्या झाकीचा आनंद घेत आहेत. दरम्यान रात्री ८ वा. ह.भ.प. मुकेश महाराज पारगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते.