जयपूर (वृत्तसंस्था) लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नी पतीला म्हणाली, ‘गेट आउट, इथून जा’. यानंतर जे माहिती पडलं त्याने पतीला धक्का बसला. पत्नीला वैतागलेल्या या पतीने पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पीडित पतीने तक्रारीत सांगितलं की, पत्नी त्याला खोट्या केसमध्ये अडकवण्याची आणि तिचा प्रियकर त्याला जीवे मारण्याची धकमी देत आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
एका वृत्तसंस्थेच्या एका वृत्तानुसार, पीडित पतीने पोलिसांना सांगितलं की, दोन्ही परिवार आणि पत्नीच्या सहमतीने आनंदात लग्न पार पडलं होतं. यानंतर पत्नीने पतीसमोर खुलासा केला की, ती दुसऱ्या तरूणावर प्रेम करते. पीडितने पोलिसांना सांगितलं, १७ नोव्हेंबर २०२१ ला त्यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर पहिली रात्र साजरी करण्यासाठी तो पत्नीजवळ रूममध्ये गेला तेव्हा ती रागाने त्याला ‘गेट आउट, इथून जा’, असं म्हणाली. तिने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. तिने सांगितलं की, ती अशोक नावाच्या तरूणावर प्रेम करते आणि ती केवळ त्याचीच आहे. पत्नीने सांगितलं की, तिच्या घरातील लोकांनी तिचं लग्न जबरदस्तीने लावून दिलं.
मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीकडून हे ऐकायला मिळाल्यावर तरूणाला धक्का बसला. तो पत्नीला समजावण्यासाठी सासरच्या लोकांसोबत बोलला. तर सासरचे लोक मुलीला समजावणं सोडून पीडित तरूणावरच ओरडले. यानंतर पीडित पतीने पोलिसांकडे मागणी केली की, त्याला पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून वाचवा. त्याचा जीव धोक्यात आहे. पत्नी त्याला कधीही खोट्या केसमध्ये अडकवू शकते.
प्रियकराने दिली जीवे मारण्याची धमकी
पीडित तरूण बढारणा रोडवरील पंच कॉलनीमध्ये राहतो. पीडित म्हणाला की, पत्नीचा प्रियकर अशोकला पत्नीपासून दूर राहण्यास सांगितलं होतं. पण तो काहीही ऐकायला तयार नाही. इतकंच नाही तर उलट त्यानेच पीडित तरूणाला पत्नीला त्रास न देण्यास सांगितलं. तसेच तिच्यासोबत संबंध ठेवले तर जीव घेईन अशी धमकी दिली. तीन महिने हा त्रास सहन केल्यावर पीडित पतीने पोलिसात तक्रार दिली.
खोट्या केसची धमकी
पीडित तरूणाने रिपोर्टमध्ये सांगितलं की, गेल्या तीन महिन्यांपासून त्याने त्याच्या पत्नी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती काही ऐकायला तयार नाही. ती नेहमी हेच सांगते की ती फक्त तिच्या प्रियकराची आहे आणि त्याचीच होणार. पुन्हा पुन्हा समजावलं तर खोट्या केसमध्ये अडकवण्याची धकमी देऊ लागते. पत्नीचा प्रियकरही गप्प राहण्याचा सल्ला देता आणि काही केलं तर जीवे मारण्याची धमकी देतो. एकदा अशोकने घरी येऊन त्याला मारहाणही केली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.