अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ढेकू रोडवरील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने लंपास केले आहेत.
या संदर्भात अधिक असे की,ढेकू रोडवरील जय योगेश्वर हायस्कुल जवळ गायत्री नगरात सुचेता अरुणराव साळुंखे (वय ५०) या वास्तव्यास आहेत. अज्ञात चोरट्यांनी दि. ९ मार्च २०२२ रोजी दुपारी ४.०० ते दि. १० मार्च २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीच्या देवांच्या मुर्त्या तसेच मणी मंगळसूत्र असा ८४ हजार ७०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ शरीफ पठाण हे करीत आहेत.