चोपडा (प्रतिनिधी) शहरातील महावीर नगरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. चोरट्यांनी हातातील बॅटरीचे उजेड खिडकीवर पडताच घरातील व्यक्तीने जोरात आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी पळ काढला. हत्यारासह लूटारू मोठ्या संख्येने असल्याने शहरभर प्रचंड भिती निर्माण झाली आहे.
महिनाभरापासून चोपडा शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जवळपास ५ धाडसी चोऱ्या केल्यानंतर काल मध्यरात्रीच्या सुमारास साधारण २ वाजेच्या ७ ते८ धिप्पाड लूटारू हत्यारासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत .दरम्यान शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी पोलिस पथकासह सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.
पोलिसांच्या पथकाने सुदर्शन कॉलनीत खिडकी तोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सुदर्शन कॉलनीतील एका घराची लोखंडी गज असलेली खिडकी कापून घरातील कपाट तोडले. मात्र घरात काहीच नसल्याने त्यांना खाली परतावे लागले आहे. याबाबत दुपारपर्यंत कोणताही तक्रारदार तक्रारीसाठी पुढे आलेला नसल्याचे समजते.