धरणगाव (प्रतिनिधी) येथील वाणी गल्लीत धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने इलेक्ट्रॉनिक मोटर, फ्यूज वायर, बंडल, वेल्डिंग मशीन, कटर मशीन, ड्रिल मशीन, मशीन काटा, लोखंडी घन, ग्राइंडर मशीन लंपास केले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात भरत मधुकर शिरसाठ (वय ३१, रा. वाणी गल्ली, धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३ एप्रिल २०२२ रोजी रात्री १० ते दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८ वाजेचा दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या चोपडा रोडवरील दुकानातून ईलेक्टीक मोटर फ्युज वायर बंडल, वेल्डीग मशीन, कटर मशीन, ड्रील मशीन, काटा, लोखंडी घन ग्रान्डर मशीन असे एकूण अंदाजे किंमत ६५ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना प्रमोद पाटील हे करीत आहेत.