पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) पेशाने शिक्षक (teacher) असलेल्या एका तरुणाने आपल्याच नात्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फटके देण्याची धमकी देत शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या या नराधमाने आपल्याच नात्यातील मुलीसोबत हे कृत्य केले आहे. आरोपी ही पीडितेच्या आतेभाऊ आहे. आरोपी हा खासगी शिकवणी वर्ग घेतो. पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून तिला घरात बोलावले. त्यानंतर 25 फटके मारीन अशी धमकी देऊन अश्लिल कृत्य केले.
या घटनेमुळे पीडिता भयभीत झाली. त्यानंतर तिने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.