मुंबई (वृत्तसंस्था) वाहनासंबंधी कागदपत्रांच्या नूतनीकरणाची वैधता संपलेल्या कागदपत्रांना आता ३० ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे ड्रायव्हींग लायसन्स, लायसन्स नूतनीकरण, वाहन योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) यासह वाहनासंबंधी इतर कागदपत्रांच्या नूतनीकरणाची चिंता भेडसवणाऱ्या वाहनधारकांना केंद्र सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. वैधता संपलेल्या कागदपत्रांना आता ३० ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.