मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करुन ही धमकी दिली. या प्रकरणी ग्रामदेवी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोन करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिल्याची माहिती आहे.पवार यांच्या सिल्वर ओक निवास्थानावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांचा काल 82 वा वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर शरद पवार यांना लगेच धमकीचा फोन येण्याने घटनेचं गांभीर्य अधिक आहे. त्याची दखल आता पोलिसांनी घेतली आहे. या धमकीच्या फोनची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. “देशी पट्टाने ठार मारू”, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने दिला आहे. फोन करणाऱी व्यक्ती हिंदीतून बोलत होती.