पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. तसेच पिडीत महिलेचा पती व सासरे यांना लाकडी काठीने मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. १० मे २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एका कारणावरुन भिकन आसाराम पाटील, संदीप उर्फ धमा भिकन पाटील, प्रतिभा भिकन पाटील यांनी ३५ वर्षीय महिलेच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश केला. तसेच शिवीगाळ करुन महिलेचा पती व सासरे यांना लाकडी काठीने मारहाण केली. तसेच पिडीत महिलेस देखील चापटा बुक्क्यांनी पोटात मारहाण केली. तर संदीप उर्फ धमा भिकन पाटील याने स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले व पिडीतेस जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तसेच पुढील तपास पोहेकॉ प्रविण पाटील हे करीत आहेत.