जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकून बदनामी करून पोस्टवर अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी अंकित पाटील आणि हरीष कोळी या नावाच्या फेसबुक धारकांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे आक्षेपार्ह फोटो व मजकूर अंकित पाटील आणि हरीष कोळी या नावाच्या फेसबुक धारकांनी टाकून व्हायरल केले. यामुळे शरदपवार यांची बदनामी केली. शिवाय पोस्टवर अश्लिल शिवीगाळ देखील केली आहे. याबाबत जळगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी सायबर पोलीस ठाण्यात दोघं फेसबुक धारकांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अंकित पाटील आणि हरीष कोळी या नावाच्या फेसबुक धारकांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहे.