मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील ग्रंथालय सुरु झाल्यानंतर आता कोचिंग क्लास पुन्हा सुरु करण्यासाठी मालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज पालक संघ आणि कोचिंग क्लासेस मालक – शिक्षकांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट होणार आहे.
पालक संघासह कोचिंग क्लासेसच्या पालक आणि शिक्षकांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांची भेट घेणार आहेत. कोचिंग क्लासेसच्या सर्व मागण्या राज ठाकरेंनी सरकार दरबारी मांडाव्या यासाठीही भेट घेण्यात येणार आहे. कोचिंग क्लासेसच्या सर्व मागण्या राज ठाकरेंनी सरकार दरबारी मांडाव्या यासाठी देखील भेट घेण्यात येणार आहे. राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अकरावीसह इतर इयत्तांचे प्रवेश रखडले आहेत. यावेळी कोचिंग क्लासचे शिक्षकांचे शिष्टमंडळ त्यांच्या काही मागण्या राज ठाकरेंकडे मांडणार आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनलॉक सुरु आहे. त्यानंतर डॉक्टर, कोळी महिला, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.