भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील मुस्लिम, बोहरी कब्रिस्तानला नगरपालिकेतर्फे मूलभूत सुविधा मिळविण्याची मागणी मुस्लिम समाज बांधवानी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन केली आहे.
शहरातील मुस्लिम समाज बांधव ही शहरात ३५ ते ४० टक्के हून अधिक असल्याने समाजाच्या दफनविधीच्या जागेवर गेल्या २० वर्षांपासून नगरपालिकेतर्फे आजही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. या ठिकाणी मुस्लिम कब्रस्तानमध्ये रोडानची दूरवस्था असून नवीन बांधण्यात यावे, येथे सिमेंटच्या पक्के बांधकाम व्यवस्था करून द्यावी, नगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा पाईपलाईन करून मिळावी, समाज बांधवांना हात पाय धुण्यासाठी (वजू खान) मध्ये पाणी पुरवठा पुरविण्यात यावे, पाणी पिण्यासाठी प्याऊजल उपलब्ध करून द्यावे, कब्रस्तानमध्ये काही स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असून काही स्ट्रीट लाईट योग्य जागेवर उपलब्ध नाही, येथील स्ट्रीट लाईट खांबवर एक प्लग, एक स्विच असा बोर्ड लावण्यात यावे, संरक्षण भिंतपर्यंत वायर व एक प्लग, एक स्विच असा बोर्ड उपलब्ध करून द्यावे, आपत्कालीन सुविधा म्हणून लाईट उपलब्ध व्हावीत यासाठी वायर व लाईट होल्डर उपलब्ध करून द्यावे जेणे करून रात्रीच्या वेळेस कब्रस्थान मालीला कब्र खोदण्यासाठी लाईटची सुविधा उपलब्ध करता येईल, येथे पत्रांचे शेड बांधून देऊन, संरक्षण भिंत बांधून मिळावी, नाल्याच्या परिसरात भागात रिटेनिंग वॉल सुविधा उपलब्ध नाही, सार्वजनिक शौचालय व बाथरूमची सुविधा नाही, येथील विहिरीसह परिसरात सुद्धा साफसफाई नाही, कबरस्तानासाठी नेमलेल्या मालीला नगरपालिका मार्फत मानधन देण्यात यावे, तसेच रजा टावर ते मुस्लिम कब्रस्तान व बोहरी कब्रस्तान प्रवेशद्वारजवळापर्यंत सुशोभी करणासाठी झाडे लावावे व नाली अंडरग्राउंड करण्यात यावी, तसेच स्ट्रीट लाईट सुविधा पुरवण्यात यावी. या मूलभूत सुविधा नगरपालिका मार्फत पुरविण्यात याव्यात, अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर आशिक खान शेर खान, इलियास इक्बाल मेमन, हबीब अहमद सरदार चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.















