भुसावळ (प्रतिनिधी) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते अमरदीप चौक, अमरदीप चौक ते खडका चौफुलीपर्यंत नगरपालिकेमार्फत मूलभूत सुविधांचे काम व रोडचे काम, नालीचे काम, नालेसफाई, नालीचे ढापा व पाइप लीकेज चे काम, स्ट्रीट लाईट व आरोग्य, साफसफाईचे काम आज पावतो अपूर्णच आहे. याच परिसराला लागून सात ते आठ प्रभाग असून हे सर्व काम पूर्ण व्हावे याबाबतीत जिल्हाधिकार्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सदस्य इक्बाल मेमन यांनी निवेदन दिले.
याबाबत सविस्तर असे की, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते अमरदीप चौक, अमरदीप चौक ते खडका चौफुली हा रहदारीचा मुख्य रस्ता असून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही कारवाई होत नाही. या रस्त्याला लागून सात ते आठ प्रभाग आहे. मात्र नगरपालिच्या मूलभूत सुविधांचे काम अपूर्णच आहे. मात्र ठेकेदारांना कामाचे पूर्ण बीले अदा करण्यात आली आहे. कामाचे परिक्षण करुन या कामाचे संबंधित विभागाने परीक्षण करून बिल दिले जातात. याबाबत जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करवाई करण्याची मागणी मेमन जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. प्रत्येक प्रभागात रोड गल्ली बोळ नालीची सफाई नियमितपणे होत नाही. नागरिकांच्या आरोग्याबाबत पालिका खेळ करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहेे.
दरम्यान, प्रभाग १४ मध्ये हजात ते १२०० मतदारांची बोगस मतदारांची नावे यादीत समाविष्ठ करण्यात आली आहे. प्रभगातील यादी भाग क्र. ९७, ९८, ९९, १००, १०१, १०२, ०१०४ अशी आहे. या यादीमधील बोगस नावे वगळण्यात यावी. सदरची यादी निवेदनासोबत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आली आहे. ही नावे रद्द करण्यासाठी संबंधित विभागाला सुचना करण्याची निवेदनातून ईलियास इक्बाल मेमन यांनी केली आहे.