यावल दि. 10 (सुरेश पाटील) : जळगाव येथील सहकारी संस्थेचे तालुका उपनिबंधक विलास गावडे यांची आज गुरुवार दि.10 नोव्हेंबर 2022 रोजी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक या पदावर पदोन्नती करण्यात येत असल्याचा आदेश महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी पल्लवी कोळेकर यांनी दिला.
महाराष्ट्र शासन कक्ष अधिकारी पल्लवी कोळेकर यांचा गुरुवार दि.10 नोव्हेंबर 2022 रोजी काढलेला आदेश बघितला असता त्यात त्यांनी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे,साखर आयुक्त साखर आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे,पणन संचालक,पणन संचालानालय महाराष्ट्र राज्य पुणे,आयुक्त, वस्त्रोद्योग आयुक्तालय नागपूर यांना दिलेल्या आदेशात नमूद केले आहे की,जळगाव सहकारी संस्था उपनिबंधक व्ही.व्ही.गावडे यांची विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक श्रीमती लाठकर यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर पदोन्नती करण्यात येत आहे.
जळगाव येथील सहकारी संस्थेचे उपनिबंधक व्ही.व्ही. गावडे यांची नाशिक विभागीय सहनिबंधक म्हणून पदोन्नती झाल्याने जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण नाशिक विभागातील सहकारी क्षेत्रातून व इतर विभागातून गावडे यांचे अभिनंदन होत आहे. नाशिक विभागीय सहनिबंधकपदी गावडे यांची नियुक्ती झाल्याने तसेच व्ही.व्ही. गावडे हे एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी असल्याने पतसंस्थेच्या ठेवीदारांना, अन्यायग्रस्त कर्जदारांना न्याय मिळणार असल्याची अपेक्षा आणि बेकायदा, गैर कायदेशीर तसेच अनियमितपणा ज्या संस्थांच्या कामकाजात आहे त्यांच्यावर कार्यवाही होणार असल्याचे सहकार क्षेत्रात बोलले जात आहे.