जळगाव (प्रतिनिधी) ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे येथील तब्बल 15 कोटी रूपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी नशिराबादचा कायापालट करून दाखवू असे दिलेले अभिवचन ते कोट्यावधी रुपयांची विकास कामे मंजूर करून हे वचनपूर्ती पूर्ण करीत आहे. 15 कोटींच्या मंजूर निधीतून शहराच्या विविध भागांमध्ये रस्ता कॉंक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, गटारी, स्मशानभूमी आणि कब्रस्तानला सुरक्षा भिंती, रस्त्यांना जोडणारे लहान पूल, सामाजिक सभागृह, बगीचांचा विकास, रस्ते खडीकरण, डांबरीकरण करणे, आदी कामांचा समावेश आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद नगरपरिषद झाल्यापासून दिड वर्षात व DPDC व नगर विकास च्या माध्यमातून एकूण 29 कोटींचे विकास कामे मंजूर करण्यात आली आहे. तर असून काही कामे प्रगती पथावर आहे. नशिराबादच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटीलयांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामस्थांनी ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करून आभार मानले आहे.
15 कोटींच्या निधीतून मंजूर कामे – पालकमंत्री साधत आहे नाशिराबादचा सर्वांगीण विकास
वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत हायवे ते पाण्याची टाकी, दत्त मंदिर ते मन्यार मज्जित ते प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यंत रस्ता, अण्णांचे उद्यान ते डॉ. यशवंत नगरपर्यंत, तात्या सोनवणे उर्दू शाळा शाह करीम मोहल्ला , रहीम किराण ते रशीद पिंजारीघरा पर्यंत, फुकटपुरा परिसर, पिंजारी मोहल्ला , इस्लामपुरा, ताज नगर परिसर, खाजा नगर परिसर, कादरी नगर, सटवाई माता परिसर, जय मुंजोबा स्वामी परिसर या भागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण , पेव्हिंग ब्लॉक बसविणे व गटारीचे बांधकाम तसेच विनायक वाणी ते घनकचरा व्यवस्थापन केंद्रापर्यंत रस्ता डांबरीकरण, पेठ स्मशान भूमि ते किरण चौधरी यांच्या शेत परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर फुलाचे बांधकाम, निमजाई माता ते शहा करीम मोहल्ला परिसरात जोडणाऱ्या रस्त्यापर्यंत पुलाचे बांधकाम, वरची अळी स्मशानभूमी ते नवीन घरकुल ते कचरा व्यवस्थापन केंद्रापर्यंत रस्त्याचे खडी करून डांबरीकरण करण्यासाठी करण्यासाठी 5 कोटी निधी मंजूर झाला आहे.
तसेच शहरातील प्रभाग क्र. 1 ते 5, प्रभाग क्र. 7 ते 10 मध्ये रस्त्यांची काँकटीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसविणे व गटार बांधकाम करणे, सुरेश चौधरी दुकान ते वरची अ ळी स्मशानभूमी पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, उंट बिडी पर्यंतचा रस्ता आणि दत्तनगर, श्रीकृष्ण नगर, साई समर्थ नगर, लक्ष्मी नगर परिसरातील रस्ते काँक्रिटीकरणव गटार बांधकाम करण्यासाठी 7 कोटी 30 लक्ष मंजूर झाले आहे.
तर 2 कोटी 70 लाखाचे निधीतून भवानी माता मंदिर परिसर झिपरू अन्ना महाराज मंदिर परिसर समोरील स्मशानभूमी , वरची आळी व पेठ भागातील स्मशानभूमी चे सुशोभीकरण करणे शाह बिरादरी कब्रास्थानास संरक्षण भिंत बांधकाम करणे, कुंभारवाडा जवळील अंगणवाडी शेजारी सामाजिक सभागृह बांधकाम करणे, 150 KVA ट्रांसफार्मर बसवणे व हौद बांधकाम करणे, गट क्रमांक 2216 मधील खुल्या जागेत उद्यान विकसित करणे या महत्त्वपूर्ण व जनतेच्या विकास कामांसाठी वन स्ट्रोक 15 कोटी रुपयांचा निधी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजूर केलेला असून लवकरच सदर कामांना सदर विकास कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळून वचनपूर्ती करून नाशिराबादाचा सर्वांगीण विकास साधत आहे.
नशिराबादच्या 33 किमीच्या 12 शेती रस्त्यांना मिळाला ग्रामीण मार्गाचा दर्जा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद शेती शिवारांना जोडणाऱ्या 33 किमीच्या 12 रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा प्राप्त करून दिल्यामुळे शेत रस्त्याची सुधारांना होणार आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी नेहमीच शेती रस्त्यांना प्राधान्य दिले आहे. रा म क्र 753 J ते नशिराबाद- 2 किमी, नशिराबाद ते मुरारखेडा ते तरसोद रस्ता-4 किमी, नशिराबाद ते ताजनगर हातेड नाला तरसोद – 3 किमी, हायवे ते रेल्वे लाईन ते नशिराबाद शिव रस्ता -2 किमी, नशिराबाद ते ग्रामा 78 ते हायवे रस्ता -2 किमी, नशिराबाद ते काकर तलाव भागपूर -3 किमी, नशिराबाद ते प्रतिमा 8 ते बेळी शिवरस्ता – 3 किमी, नशिराबाद ते हायवे जळगाव खुर्द रस्ता -4 किमी, नशिराबाद ते इंडियन ऑईल डेपो रस्ता – 2 किमी, नशिराबाद ते कुंडलेश्वर रस्ता – 3 किमी, नशिराबाद ते प्रतिमा 9 ते शेत गट क्रमांक 133 बेळी शिव रस्ता – 2 किमी असे एकूण 33 किलोमीटरच्या 12 रस्त्यांचे भाग्य उजाळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नगरपरिषद झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 29 कोटींची कामे मंजूर !
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद नगरपरिषद झाल्यापासून दिड वर्षात व DPDC च्या माध्यमातून अग्निशमन गाडी 1 कोटी, नागरोत्थान मधून 1 कोटी 16 लक्ष, नागरी दलीतेत्तर मधून 1 कोटी, दलित वस्ती सुधार मधून 3 कोटी, असे एकूण 6 कोटी तर नगरविकास विभागा मार्फत न.पा.ची नवीन प्रशासकीय इमारत 4 कोटी, स्मशानभूमी सुशोभीकरण 1 कोटी, अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्रात 50 लक्ष, झिपरू आण्णा महाराज मंदिर विकसित करणे 2 कोटी, आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत 15 कोटींचे कामे अशी एकूण 29 कोटींचे विकास कामे मंजूर करण्यात आली असून काही कामे प्रगती पथावर आहे.
नशिराबादकरांनी केला पालकमंत्र्यांचा सत्कार !
नशिराबादच्या विकास करीता 15 कोटी निधी मंजूर केल्याबद्दल नशिराबाद येथील शिवसेना, युवासेना व भाजपाच्या पदाधिकारी व नगर वासियांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, तत्कालीन सरपंच विकास पाटील, उपसरपंच किर्तीकांत चौबे, शहर प्रमुख विकास धनगर, युवसेनेचे चेतन बर्हाटे, चंद्रकांत भोळे, कैलास नेरकर,पिंटू शेठ पाटील, अस्लमसर , सलीम मास्तर, चंद्रकांत भोळे, एकनाथ नाथ, किरण पाटील, मनोज रोटे, धनराज राणे, सत्तार पहेलवान, यांच्यासह सर्व धर्मीय पदाधिकारी व शहरवासीय उपस्थित होते.
नशिराबादला नवीन वैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री गुलाबराव पाटील
नशिराबाद हे जळगाव तालुक्यातील सर्वात मोठे शहर असून ते कधी काळी खूप मोठी बाजारपेठ होती. ब्रिटीश काळात नशिराबादला जळगावपेक्षा जास्त महत्व होते. काळाच्या ओघात जळगाव प्रगतीत खूप पुढे निघून गेले तरी नशिराबाद हे खूप मोठे व महत्वाचे शहर मानले जाते. त्यामुळे ग्रामपंचायत तिचे रूपांतर नगरपरिषद मध्ये केले. आपण नशिराबादचा कायापालट करून दाखवू असे अभिवचन दिलेले आहे. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजना म्हणजे DPDC आणि शासनाच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून मागील वर्षी 14 कोटी निधी मंजूर केलेला आहे आणि कालच नशिराबादच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल 15 कोटींचा निधी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मंजूर करून दिला आहे. एकूण 29 कोटी निधी मंजूर झाल्यामुळे नशिराबाद शहराच्या विविध भागांमध्ये रस्ता काँक्रीटीकरण,पेव्हिंग ब्लॉक बसविणे, स्मशानभूमी बांधकाम, कब्रस्तानला संरक्षण भिंती, रस्त्यांना जोडणारे लहान पूल, सामाजिक सभागृह बांधकाम, बगीचे विकसित करणे, रस्ते खडीकरण व डांबरीकरण असे विविध विकासकामे या 15 कोटीतून होणार असल्याने नागरिकांना पायाभूत सुविधा मिळणार आहे. आणखी DPDC व शासनाच्या नगरविकास माध्यमातून नशिराबदला नवीन वैभव प्राप्त करण्यासाठी विकास कामांसाठी भरघोस निधी प्राप्त करून वचनपूर्तीसाठी प्रयत्नशील आहे, असल्याचेही ना. पाटील यांनी म्हटले आहे.