जामनेर (प्रतिनिधी) मालाड येथील क्रीडासंकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका चौकात फडणवीस यांचा पुतळा जाळला होता. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत, सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस…मालाड येथील क्रीडासंकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या कार्यक्रमाबाबत ट्वीट केले होते. याच्याच निषेधार्थ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका चौकात फडणवीस यांचा पुतळा जाळला होता. तसेच फडणवीस मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या कोरोना प्रतिबंधीत आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी जितेंद्र उर्फ पप्पु रमेश पाटील,मोहम्मद खालीद,जकी अब्दुल, साबीर मोती शेख (मिस्तरी), इमान गफ्फार, जावेद रशीद मुल्लाजी, मुज्जफर आयफान मुल्लाजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे करीत आहेत.
















