मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत अमृता फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेना भेटायला जायचे. असा गौप्यस्फोट अमृता फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केला आहे.
अमृता फडणवीस आपल्या मुलाखतीत म्हणाल्या की, सत्तासंघर्षाच्या काळात सगळे आमदार झोपल्यावर देवेंद्र फडणवीसांना भेटायला जायचो, असं विधानसभेत केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. त्यापुढे एक पाऊल टाकत आज अमृता फडणवीसांनी नवा गौप्यस्फोट केलाय. मला माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, तसेच कोणतंही पद स्वीकरणार नाही, याबाबत मला गर्व वाटत होता. की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिले, तसेच मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना कोणताही फरक पडणार नव्हता. असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
देवेंद्र साधारण खूप रात्रीपर्यंत काम करतात. दरम्यानच्या काळात जॅकेट वगैरे घालून ते घराबाहेर पडायचे. डोळ्यावर चष्मा वगैरे घालायचे. मलाही कधीकधी ओळखायला यायचं नाही. त्यावर मी त्यांना विचारलंही, की नवीन काही सुरु आहे का? तर उत्तर न देता ते प्रश्न टाळायचे. पण मला वाटायचं की काही ना काही मोठी राजकीय घडामोड सुरु आहे.
















