अमळनेर (प्रतिनिधी) फार्मसी विद्यार्थ्यांना वेळोवेळी न्याय मिळवून देणाऱ्या केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन संचलित फार्मसी स्टुडन्ट कौन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी माननीय लोकसेवक मधुकरराव चौधरी, कॉलेज ऑफ फार्मसी, फैजपूर येथील विद्यार्थी देवांग चंद्रकांत काटे यांची निवड करण्यात आली आहे.
फार्मासिस्ट विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून काम करते. ही संघटना वेगवेगळे उपक्रम राबवत असते. शैक्षणिक क्षेत्रात या संघटनेने आपले वेगळे अस्तित्व सुद्धा निर्माण केले आहे. देवांग चंद्रकांत काटे हे गेल्या अनेक दिवसांपासून फार्मसी स्टुडन्ट कौन्सिल ऑफ महाराष्ट्रमध्ये अतिशय सुंदर काम करत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल ऑल इंडिया केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ आप्पासाहेब शिंदे, औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष विजय पाटिल साहेब व फार्मसी स्टुडन्ट कौन्सिल ऑफ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भूषण भदाणे, सचिव प्रत्त्युम रामचंद्र पाटील, फार्मसी स्टुडन्ट कौन्सिल महाराष्ट्र राज्य व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष स्वप्नील हिरे यांनी ही नियुक्ती केली आहे.