धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चांदसर येथील गोशाळेजवळ एका तरुणाला मारहाण करून दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्रात कल्पेश महेश पाटील (रा. चांदसर ता. धरणगाव) यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पंकज बारकू पाटील (वय २३, रा. कवठळ ता. धरणगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १२ एप्रिल २०२२ रोजी पंकज पाटील याची मोटारसायकल क्र. Mh १९ bn ९२१९ वर जात असतांना सांयकाळी ०७.३०ते ०७.४५ वा. चे सुमारास चांदसर ता. धरणगाव गोकुळ गोशाळे जवळ एका मोटारसायकलवर तिन इसम (पुरुष) अंदाजे २० ते २२ वर्ष वयोगटाचे असे आले त्यानी पंकज पाटील याची मोटारसायकल थांबविली व कल्पेश महेश पाटील (रा. चांदसर ता. धरणगाव) यास फोन करुन बोलावुन घेवुन त्याने पंकज पाटील व त्याच्यासोबत असलेला धनंजय दत्तात्रय पवार (रा. कवठळ) यास लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच त्याचे हातातील काहीतरी वस्तु कपाळावर मारुन मला दुखापत करुन शिवीगाळ दमदाटी केली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्रात कल्पेश महेश पाटील (रा. चांदसर ता. धरणगाव) यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ अरूण निकुंभ करीत आहेत.